Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहे. आता मकर संक्रांतनिमित्त (Makar Sankranti) या मालिकांचे विशेष भाग रंगणार आहेत. यात 'होम मिनिस्टर' (Home Minister), 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector), 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकांचा समावेश आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. आता ही मालिका एका रोमांचक वळणावर आहे. आता या मालिकेत अप्पी आणि अर्जुनची पहिली मकरसंक्रांत पाहायला मिळणार आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पीचा कलेक्टर बनण्याचा प्रवास सुरू झाला आहे. या प्रवासात तिला अर्जुनची साथ मिळत आहे. मालिकेच्या येत्या भागात अप्पी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करताना दिसणार आहे. हलव्याचे दागिने घालून दोघे सजलेले दिसणार आहे. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
महारविवार एक तासांचे विशेष भाग
'होम मिनिस्टर' या मालिकेचा विशेष भाग रविवारी दुपारी 12 आणि सायंकाळी 6 वाजता रंगणार आहे. तर 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा विशेष भाग दुपारी 1 आणि सायंकाळी 7 वाजता होणार आहे. तसेच 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा विशेष भाग दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता रंगणार आहे.
होम मिनिस्टरचा विशेष भाग होणार खास
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी म्हणजेच लाडके राणादा आणि अंजलीबाई नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांची लग्नानंतरची पहिली संक्रात साजरी होणार आहे. 'होम मिनिस्टर'च्या विशेष भागात अक्षया आणि हार्दिक सहभागी होणार आहेत.
संबंधित बातम्या