Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीने आता सर्वायकल कॅन्सरसंदर्भात (Cervical cancer) केलेल्या सर्व पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केल्या आहेत. अभिनेत्रीने या पोस्ट डिलीट केल्याने नेटकऱ्यांनी डोक्यावर हात मारला आहे. दरम्यान लवकरच सत्य समोर आणणार असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे.
पूनम पांडेची नवी पोस्ट काय? (Poonam Pandey New Post)
पूनम पांडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"लवकरच सत्य समोर येईल". ही पोस्ट शेअर करण्यासोबत पूनमच्या निधनाची बातमी देणारी तिच्या टीमने केलेली पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.
पूनम पांडे नेटकऱ्यांकडून ट्रोल
पूनम पांडेला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. आता आम्ही कोणतीही फेक न्यूज ऐकू शकत नाही, आता बोलेल माझं खरचं निधन झालं आहे, आता अजून काही बाकी आहे का? पूनम पांडेवर आता आमचा विश्वास नाही, अभिनेत्री आता खूप अती करत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
पूनम पांडेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अशातच दुसऱ्या दिवशी आपण जिवंत आहोत असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला. तसेच सर्वायकल कॅन्सरसंदर्भात एक वेबसाईट सुरू केल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. सर्वायकल कॅन्सरसंदर्भात जगजागृती करण्यासाठी अफवा पसरवली असल्याचं तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं. त्यामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी नंतर तिची शाळा घेतली.
पूनमच्या 'त्या' पोस्टनंतर निधनाच्या उलट-सुलट चर्चांना सुरुवात
पूनम पांडेने 2 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कॅन्सशी झुंझ देणारी आपली लाडकी पूनम आपल्याला सोडून गेली. तिला सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)
पूनम पांडे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या हॉट अंदाजाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 2013 मध्ये 'नशा' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक सिनेमांत आणि छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
संबंधित बातम्या