गोव्यातील अश्लील व्हिडीओ शूटिंग प्रकरणात पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना जामीन मंजूर

एबीपी माझा वेब टीम Updated at: 06 Nov 2020 02:16 PM (IST)

अश्लील व्हिडीओ शूटिंग प्रकरणात गोवा पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांनाही गुरुवारी (5 नोव्हेंबर) अटक केली होती. दोघांना जामीन मिळाला असला तरी त्यांना गोवा सोडता येणार नाही.

NEXT PREV

पणजी: अश्लील व्हिडीओ शूटिंग प्रकरणी अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना गोव्याच्या कॅनकोना येथील प्रथम वर्गाच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाला असला तरी त्यांना गोवा सोडता येणार नाही. या दोघांनाही पुढचे सहा दिवस रोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी लावावी लागेल असेही न्यायालयाने सांगितले आहे. पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना प्रत्येकी 20,000 रुपयांच्या जामीनावर सोडण्यात आले आहे. गोवा पोलिसांनी कालच (5 नोव्हेंबर) या दोघांना अटक केली होती.


अश्लील व्हिडीओ शूटिंग प्रकरण
पूनम पांडेने तिच्या अलिकडच्या गोवा ट्रीपमध्ये अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. याविरोधात गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला विंगने तिच्याविरोधात कॅनकोना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पूनम पांडे कायद्याच्या कचाट्यात सापडली.


पूनम पांडेवर सरकारी संपत्ती असलेल्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करुन अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे. दक्षिण गोव्याच्या कॅनकोना शहरातील अनेक नागरिकांनी या शूटदरम्यान सरकारी संपत्तीचा बेकायदेशीर वापर करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर पूनम पांडेच्या शूटिंगला संरक्षण पुरवण्याच्या आरोपाखाली पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.


दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी सांगितले की, "31 ऑक्टोबर रोजी सकाळी चपोली धरणाच्या परिसरात पूनम पांडे आणि तिचा पती या दोघांनी अश्लील व्हिडीओ शूट केला होता हे पोलिस तपासातून समोर आलं आहे. त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेने तिच्या पतीविरोधात मारहाणीची तक्रार केली होती. त्या प्रकरणात तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती.



-


महत्वाच्या बातम्या:


गोव्यात अभिनेत्री पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल; अश्लील वीडियो शूट केल्याचा आरोप


Poonam Pandey | लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेच्या विरोधात गुन्हा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.