मुंबई : अभिनेत्री पूजा हेगडेने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी 'Post a Photo of' ट्रेंडच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पूजाने तिचे अनेक फोटो शेअर केले. सोशल मीडियावर पूजासोबत काही चाहत्यांनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र पूजाने या चाहत्यांना दिलेला रिप्लाय देखील हटके होता.


पूजाच्या चाहत्यांनी तिच्याकडे अनेक फोटोंची मागणी केली. एका विचित्र चाहत्याने पूजाला न्यूड फोटो शेअर करण्यास सांगितलं. पूजानेही त्या चाहत्यांच्या रिक्वेस्टनुसार एक फोटो शेअर केला. पूजाने तिच्या पायांचा फोटो शेअर केला आणि 'न्यूड पाव' असं लिहिलं. पूजाने चाहत्याला दिलेल्या या रिप्लायची सध्या चर्चा आहे.



पूजा हेगडेचे आगामी चित्रपट

पूजाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भास्कर करत आहेत. पूजासोबत अखिल अक्कीनेनी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती प्रभास स्टारर फिल्म ‘राधे श्याम’ मध्ये दिसणार आहे. 'सर्कस' आणि 'आचार्य' सारख्या प्रोजेक्ट्सवरही ती काम करत आहे.