Bigg Boss : बिग बॉस 14 च्या नुकत्याच झालेल्या एका भागात राखी सावंतनं काही गौप्यस्फोट केले आहेत. या भागात तिनं अभिषेक अवस्थीसोबतच्या ब्रेकअपसंदर्भात भाष्य केलं. यावेळी बोलताना तिनं तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबाबत देखील गौप्यस्फोट केला आहे. राखी सावंतनं सांगितलं की, मी मुंबईत एका चाळीत राहात होते. घरी खूप गरीबी होती. माझ्या आईची प्रकृती खराब राहायची. मी लहान असताना माझ्या आईला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी तिच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करावी लागली. राखीनं सांगितलं की, माझ्या एका मित्राने पैशांच्या बदल्यात माझं लैंगिक शोषण केलं. एका कारमध्ये लैंगिक शोषण केलं असल्याचं सांगत राखी ढसाढसा रडली.


राहुल वैद्यशी संवाद साधताना राखी सावंतनं अभिषेक अवस्थीसोबतच्या ब्रेकअपसंदर्भात भाष्य केलं. ती म्हणाली मला अभिषेकनं धोका दिला असेल मात्र मी त्याला एकवेळ माफ देखील करेल. यावर राहुलनं दु:ख व्यक्त केलं आणि राखीला दिलासा दिला.


राखीनं रडत रडत सांगितलं की, लैंगिक शोषणाची घटना मी माझ्या आईला सांगितली नाही. त्यावर राहुल म्हणाला की, मग तू प्रसिद्ध झाल्यावर या विरोधात आवाज का उठवला नाही. त्यावर राखीनं माझ्याकडे याबाबत काही पुरावे नाहीत, तर मी तक्रार कशी करणार असं म्हटलं.


रितेशचं लग्न झालंय
यावेळी राखी सावंतनं सांगितलं की, तिचा नवरा रितेशचं लग्न आधी झालेलं आहे आणि त्याला एक मुल देखील आहे. तिनं सांगितलं की, रितेशनं मला आतापर्यंत पाच ते सहा वेळा घटस्फोटाची धमकी दिली आहे.