Ponniyin Selvan 2 Release Date : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा चांगलाच गाजल्याने प्रेक्षक आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन 2 ('Ponniyin Selvan 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


'पोन्नियिन सेल्वन 2' कधी होणार रिलीज? (Ponniyin Selvan 2 Release Date) 


'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस राहिले असून या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यामुळे आता या सिनेमाचा दुसरा भाग किती कमाई करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.


'पोन्नियिन सेल्वन 2'च्या अॅडव्हान्स बुकींगबद्दल जाणून घ्या...


'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली असून अॅडव्हान्स बुकींगमध्ये हा सिनेमा जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाचे 200k तिकीट विकले गेले आहेत. त्यामुळे आता रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 2 मिलिअन डॉलरचा आकडा पार करू शकतो, असे म्हटले जात आहे. 






'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा लोकप्रिय लेखक कल्कि कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवी आणि त्रिया कृष्णन सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन 2' या सिनेमाची क्रेझ सिनेप्रेमींमध्ये चांगलीच आहे. 


दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह परदेशातील सिनेप्रेमीदेखील या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर आता रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे. येत्या 28 एप्रिल 2023 पासून प्रेक्षक हा सिनेमा सिनेमागृहात पाहू शकतात. 


'पोन्नियिन सेल्वन 2' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आमने-सामने


'पोन्नियिन सेल्वन 2' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे दोन्ही सिनेमे 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एकाचदिवशी हे दोन्ही बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत असल्याने नक्की कोणता सिनेमा आधी पाहावा असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 


संबंधित बातम्या


Ponniyin Selvan 2 Trailer Out: सिंहासनासाठी होणार युद्ध; अंगावर शहारे आणणारा पोन्नियन सेल्वन 2 चा ट्रेलर झाला रिलीज