मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट येत्या 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमुंग कुमार यांनी याबाबतची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार आहे. अभिनेते मनोज जोशी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भूमिका करत आहेत. बरखा सेनगुप्ता ही अभिनेत्री चित्रपटात मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी भूमिका करणार आहे. तर अभिनेत्री जरीना वाहब ही मोदींची आई हिराबेन यांची भूमिका साकारणार आहे.

मोदींचा बायोपिक ऐन निवडणुकांच्या मोसमात प्रदर्शित केला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाचा मोदींना किती फायदा होणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल. 11 एप्रिल रोजी लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. तर 12 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.