Pitchers S2 Trailer: ओटीटीवरील विविध विषयांवर आधारित वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही वेब सीरिजच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. नुकत्याच एका वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाली. या सीरिजचं नाव पिचर्स (Pitchers) असं आहे. पिचर्स (Pitchers-2) सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 


पिचर्सच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती
पिचर्स ही सीरिज सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 ला प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकली.  IMDB वरील सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या शोमध्ये पिचर्स सीरिजचा समावेश होतो. या सीरिजला प्रेक्षकांकडून 9.1 रेटिंग मिळाले. सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये चार मित्र हे त्यांची नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु करतात. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये हे चार मित्र त्यांच्या कंपनीच्या ग्रोथकडे लक्ष देताना दिसणार आहेत. चार मित्रांनी सुरु केलेल्या या कंपनीचा परिवार आता 25 मेंबर्सचा झालेला बघायला मिळणार आहे.


पाहा ट्रेलर: 



पिचर्स-2 ची कास्ट
नवीन कस्तुरिया, अरुणाभ कुमार, अभय महाजन, अभिषेक बॅनर्जी, रिद्धी डोगरा, सिकंदर खेर, गोपाल दत्त आणि आशिष विद्यार्थी यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. वैभव बंधू यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 


कुठे पाहता येणार सीरिज? 
पिचर्स-2 ही वेब सीरिज प्रेक्षक झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहेत. ही सीरिज 23 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


प्रेक्षकांमध्ये उत्सुकता


पिचर्स-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सीरिजचा ट्रेलर टीव्हीएफ या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ही वेब सीरिज कधीच संपू नये. ही जगातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'बॅकग्राऊंड म्युझिक ऐकून माझ्या अंगावर शहारे आले.'


काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.  या टीझरमध्ये सीरिजच्या पहिल्या सिझनमधील एक सिन दाखवण्यात आला. या टीझरला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे, 'सात वर्ष, तीन महिने, पाच दिवसानंतर फायनली आम्ही पुन्हा परत आलो आहोत.'


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Pitchers Season 2 Teaser: पिचर्स वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा; टीझर रिलीज