PhoneBhoot Official Trailer:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) , अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan khatter) अभिनीत 'फोन भूत'च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'फोन भूत' (PhoneBhoot) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. 


हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज 'फोन भूत'चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे. 


दर्शकांसाठी हा ट्रेलर खरोखरच अनोखा असून, यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर भूत शिकारीचा  विशिष्ट भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर जेव्हा जगातील सर्वात सुंदर भूत कतरिना कैफला भेटतात तेव्हा एक भयकारी प्रवास सुरु होतो. ट्रेलरमधील धम्माल पाहताना प्रेक्षकांना एकीकडे कतरिना स्वतःची खिल्ली उडवताना दिसते आणि दुसरीकडे अनेक भयानक अनुभवांदरम्यान देखील हसू येईल. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


पाहा ट्रेलर: 



'भूल भुलैया 2' नंतर प्रेक्षकांना 'फोन भूत' हा हॉरर कॉमेडीपट पाहायला मिळणार असून प्रेक्षकांनी या मनोरंजक आणि मजेदार शैलीवर प्रचंड प्रेम दाखवले आहे. गुरमीत सिंह दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, 'फोन भूत' हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आहे.


चित्रपटाचं कथानक


'फोन भूत' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची कथा एका दुकानाभोवती विणली गेली आहे, जिथे भूत-प्रेत यांना कैद करण्याचे सामना विकले जाते. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मोशन पोस्टरच्या सुरुवातीला इशान खट्टर खांद्यावर सांगाडा घेऊन दिसत आहे. यानंतर सिद्धांत आणि कतरिना देखील ईशान खट्टरसोबत बसलेले दिसत आहेत. ब्लॅक आउटफिटमध्ये कतरिना एखाद्या तांत्रिकाप्रमाणे भासत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!