Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या नव्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) असे या सिनेमाचे नाव आहे. 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Continues below advertisement





'बच्चन पांडे' या सिनेमाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि कृती सेनन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असणार आहे. अक्षयने सिनेमाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.






अक्षयचे आगामी सिनेमे
अक्षयचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाइपलाइनमध्ये आहेत. 'राम सेतू' सिनेमात अक्षय जॅकलीन सोबत दिसणार आहे. 'रक्षाबंधन', 'पृथ्वीराज', 'सेल्फी' आणि 'सिंड्रेला' हे त्याचे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तसेत तो लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.


संबंधित बातम्या


Moon Knight Trailer  : मारवेल चा बॅटमॅन; मूननाईटचा क्रेझी ट्रेलर रिलीज!


Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने केला विक्रम, ऑस्करच्या यूट्युब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha