Shah Rukh Khan Pathan Worldwide Box Office Day 3 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. शाहरुखचे चाहते गेल्या चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'पठाण'च्या (Pathaan) माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत.
शाहरुखचा चाहतावर्ग जगभरात असून त्याच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन सिनेमाचा आनंद घेत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवलेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.
'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन.. (Pathan Box Office Collection)
'पठाण' (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 कोटींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. दुसऱ्या दिवशी 68 कोटींची कमाई केली. तर आता रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या सिनेमाने पहिल्या दोन दिवसांपेक्षा कमी कमाई केली आहे. 'पठाण'ने तिसऱ्या दिवशी फक्त 35 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 158 कोटींचा गल्ला जमवला आहे.
भारतातील कमाई
- पहिला दिवस - 55 कोटी
- दुसरा दिवस - 68 कोटी
- तिसरा दिवस - 35 कोटी
- एकूण - 158
'पठाण' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मोठ्या प्रमाणात या सिनेमावर टीका होत होती. पण शाहरुखच्या चाहत्यांवर मात्र या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही. आता या सिनेमाचं शाहरुखच्या चाहत्यांसह सेलिब्रिटी आणि सिनेविश्वातील अनेक दिग्गजांनीदेखील कौतुक केलं आहे. आता हा सिनेमा पहिल्या वीकेंडला किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'पठाण' सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abrham) मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरात हा सिनेमा 8000 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे.
संबंधित बातम्या