Shah Rukh Khan Pathaan Trailer : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीच ऑनलाइन लीक झाला आहे. 


'पठाण'चा ट्रेलर ऑनलाइन लीक (Pathaan Trailer Leaked) 


शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच चर्चेत आहे. या सिनेमातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. यातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यामुळे हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना दुसरीकडे चाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सिनेमाचा ट्रेलर ऑनलाइन लीक झाला आहे. या ट्रेलरमध्ये किंग खान अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 






'पठाण'च्या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलं आहे,"पठाणचा ट्रेलर लीक'. ट्रेलरची झलक पाहिल्यानंतर चाहत्यांना आता या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या वाढदिवशी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. 


'पठाण'चा ट्रेलर कधी रिलीज होणार? (When will the trailer of 'Pathaan' released?


'पठाण' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी या सिनेमातील दोन गाणी आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या 'पठाण' या सिनेमाचा ट्रेलर 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'पठाण'ची रिलीज डेट बदलणार? 


'पठाण' या सिनेमाला विरोध होत असल्याने या सिनेमाची रिलीज डेट बदलणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. के.आर. केने ट्वीट करत म्हटलं होतं,"शाहरुख खान 'पठाण' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार आहे. तसेच या सिनेमाचे नावदेखील बदलण्यात येणार आहे". या ट्वीटमुळे शाहरुखचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. 


'पठाण'च्या रिलीज संदर्भात किंवा नावासंदर्भात निर्मात्यांनी किंवा शाहरुख खानने अद्याप भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आता हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करेल असं म्हटलं जात आहे. 


संबंधित बातम्या


Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार? प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा