Pathaan Ticket Booking : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पठाण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती तरण आदर्श यांनी ट्वीट शेअर करुन दिली आहे.

तरण आदर्श यांनी पठाण या चित्रपटाच्या नॅशनल चेन्समधील अॅडव्हान्स बुकिंगबाबत सांगितलं आहे. 19 जानेवारीपर्यंतच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'पठाची नॅशनल चेन्समधील गुरुवार (19 जानेवारी) रात्री 11.30 वाजेपर्यंतचे बुकिंग-PVR: 51,000INOX: 38,500Cinepolis: 27,500एकूण-1,17,000'

पठाण या चित्रपटाचं फुलफ्लेज अॅडव्हान्स बुकिंग हे आजपासून (20जानेवारी) सुरु होणार आहे, अशी माहिती देखील या ट्वीटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 

पठाणच्या माध्यमातून शाहरुखचं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन

पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटामधील बेशरम रंग (Besharam Rang) आणि झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती

पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बेशरम रंग या गाण्यावरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता. 

पठाण व्यतिरिक्त शाहरुख हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे.  तसेच त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan : 'बेशरम रंग' गाण्याबाबत पहिल्यांदाच बोलला शाहरुख; म्हणाला, 'दीपिकासारखी अभिनेत्री...'