Pathaan Advance Booking : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आगामी 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा रिलीजआधीच ब्लॉकबस्टर ठरला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवण्यात यश आलं आहे. भारतात या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून काही तासांत या सिनेमाच्या 40 हजार तिकीटांची विक्री झाली आहे.
'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्यामुळे 'पठाण'च्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची चाहत्यांना उत्सुकता आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'पठाण' सिनेमाची काही मिनिटांत 50,000 तिकीटांची विक्री झाली आहे. त्यामुळे आता रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा नक्की किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतात 20 जानेवारीपासून या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे 'पठाण'ला विरोध होत आहे. तर दुसरीकडे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पीवीआरचे (PVR) 75,000 आयनोक्सचे (INOX) 60,500 आणि सिनेपोलिसच्या (Cinepolis) 35,500 तिकीटांची विक्री झाली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत या सिनेमाच्या एकूण 1,71,500 तिकीटांची विक्री झाली आहे.
'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच 15 कोटींची कमाई करू शकतो असं म्हटलं जात आहे. या सिनेमातील 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पठाण' सिनेमात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमदेखील (John Abraham) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. शाहरुख आणि दीपिकाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
पठाण सिनेमाची गाणी आणि ट्रेलर आल्यानंतर या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटाचा विरोध देखील काही संघटनांनी केला आहे.
संबंधित बातम्या