Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलचा (KL Rahul) बहुचर्चित लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वासह क्रिकेटविश्वात या लग्नसोहळ्याची चर्चा सुरु आहे. अखेर आजपासून अथिया आणि राहुलच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात होणार आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा शाही विवाहसोहळा (Athiya Shetty KL Rahul Wedding) सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्या खंडाळा येथील बंगल्यात पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर येत्या 23 जानेवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत अडकणार लग्नबंधनात
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी त्यांच्या लाडक्या लेकीचं थाटामाटात लग्न लावणार आहेत. पण या लग्नसोहळ्याची खासियत म्हणजे केएल राहुल आणि अथिया शेट्टी फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे आदेश पाहुण्यांना देण्यात आले आहेत. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याला मोजके पाहुणे उपस्थित असणार असल्याने लग्नानंतर काही आठवड्यांनी एका खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेट विश्वातील मंडळींसाठी खास या खास रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.
अथिया आणि केएल राहुलचा लग्नसोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरी दोघांनीही अद्याप लग्नासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. अथिया आणि केएल राहुलचं घर तसेच सुनील शेट्टींच्या खंडाळा येथील बंगल्यावर खास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
अथिया-केएल राहुलच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची हजेरी
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्यात सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), विराट कोहली (Virat Kohli), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. आज आणि उद्या हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल राहुल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
अथिया आणि केएल राहुल पहिल्यांदा एका पार्टीत भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आता अथिया आणि केएल राहुल नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
संबंधित बातम्या