Parineeti Chopra Raghav Chadha Visits Golden Temple : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे  खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव अनेकदा स्पॉट झाले असून आता नुकतच त्यांनी पंजाबमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. 


परिणीती आणि राघव यांचे पंजाबमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे राघव चड्ढा यांनी पांढरा कुर्ता, पायझमा आणि राखाडी रंगाचं नेहरु जॅकेट आणि डोक्यावर केशरी रंगाचं कापड बांधलेलं दिसत आहे. 






परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात कधी अडकणार? (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update)


मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या वर्षी सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. अभिनेत्रीने नुकतीच पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेतली असून चांगली ठिकाणे आणि हॉटेलची चौकशी केली आहे.


बहिण प्रियांचा चोप्राच्या (Priyanka Chopra) पावलावर पाऊल टाकत परिणीतीदेखील राजस्थानमध्ये शाही थाटात लग्नबंधनात अडकणार आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकारणी मंडळीदेखील हजेरी लावणार आहेत. 


नेटकऱ्यांनी साधला निशाणा


सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आलेल्या परिणीतीने डोक्यावर पूर्ण ओढणी घेतली नव्हती. त्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर "नियम सर्वांसाठी सारखेच असायला हवेत", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. त्यावर कमेंट नेटकऱ्यांनी लिहिलं आहे,"देवाच्या दारातही दिखावा, देवाच्या दारातही इतकी कडक सुरक्षा...खरा रक्षक फक्त देव आहे. 


परिणीतीचा कोडनेम तिरंगा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  'चमकिला' हा परिणीतीचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात ती दिलदीत दोसांझसोबत झळकणार आहे. इम्तियाज अलीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


संबंधित बातम्या


Parineeti Chopra: 'माझं अजून लग्न झालेलं नाही'; पापराझीच्या प्रश्नाला परिणीतीचं उत्तर