Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला काही नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता परिणीतीच्या आईनं राघव आणि परिणीती यांचा साखरपुड्यातील एक फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे.


परिणीतीच्या आईची पोस्ट



परिणीतीची आई रीना ​​चोप्रा यांनी राघव आणि परिणीती यांचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमच्या जीवनात अशी काही कारणं असतात ज्यामुळे तुम्ही देव आहे, यावर विश्वास ठेवता. त्यापैकी हे एक कारण आहे.मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी त्या दोघांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या' परिणीतीच्या आईनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






परिणीतीची आई रीना ​​चोप्रा यांनी राघव आणि परिणीती यांच्या सारखपुड्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये परिणीतीचे कुटुंब हे ऑल व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा देखील दिसत आहे. 






परिणीती आणि राघव यांच्या शाही साखरपुड्याची थीम हटके होती. त्या दोघांनी पेस्टल रंगाचे  कपडे परिधान केले होते. दोघेही या अतिशय सुंदर दिसत होते. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. आता परिणीती आणि राघव हे लग्न कधी करणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 


परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Parineeti Chopra Raghav Chadha : राघव आणि परिणीती यांचा साखरपुड्यातील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल; केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष