Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये (London) त्यांचा साखरपुडा होणार आहे. 


साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असला तरीही परिणीती किंवा राघव यांनी त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना काहीही सांगितलेलं नाही. सध्या परिणीती चोप्राचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती लंडनमध्ये जात असल्याचे पापराझींना सांगत आहे. 






मुंबई विमानतळावर परिणीती स्पॉट झाली असून पापराझी तिला साखरपुड्यासंबंधित प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नावर परिणीती लाजत म्हणाली की, मी लंडनमध्ये जात आहे. तुम्हाला बोर्डिंग पासदेखील दाखवू शकते". परिणीतीच्या या व्हिडीओवर आपच्या प्रचारासाठी परिणीती लंडनला जात आहे, आता साखरपुडा करुनच ये, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


परिणीती आणि राघव सहा महिन्यांपासून रिलेशनमध्ये...


गेल्या सहा महिन्यांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकमेकांना डेट करत आहेत. आजवर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. मुंबई विमानतळावरील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परिणीता जेव्हा राघवसंबंधित प्रश्न विचारला जातो तेव्हा नेहमीच ती लाजताना दिसते. 


आम आदमी पार्टीचे संजीव अरोडा यांनी ट्वीट करत परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केलं होतं की,"दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा". तसेच गायक हार्डी संधूनेदेखील परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं.


राघव चढ्ढा परिणीतीला पहिल्यांदा कुठे भेटले? (Parineeti Chopra Raghav Chadha Love Story)


परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.


संबंधित बातम्या


Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार साखरपुडा?