Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि 'आप'चे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं समोर आलं आहे. 


परिणीती-राघवचा साखरपुडा कधी होणार? 


हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा साखरपुडा होऊ शकतो. अद्याप दोघांनीही यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीत त्यांचा साखरपुडा होणार आहे". 


मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार साखरपुडा


मीडिया रिपोर्टनुसार,"परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडेल. बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंचा चोप्रा, निक जोनस आणि त्यांची लेक मालतीदेखील या साखरपुड्याला उपस्थित असणार आहे. मीरा कपूरदेखील या साखरपुड्याला हजेरी लावणार आहे. 


परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना नुकतचं मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. विमानतळावरील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता नवी दिल्लीत त्यांचा साखरपुडा होणार असून दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'चश्मिश' असं लिहिलं आहे. राघव चढ्ढा यांना चश्मा असल्याने नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे की,"तू राघव चढ्ढा यांना चश्मिश म्हणतेस का?"






परिणीती चोप्राचे आगामी प्रोजेक्ट (Parineeti Chopra Upcoming Movies)


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'ऊंचाई' या सिनेमात परिणीती शेवटची दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. आता प्रियंकाचे 'चमकिला' आणि 'कॅप्सूल गिल' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सत्य परिस्थितीवर आधारित हे दोन्ही सिनेमे आहेत. 


संबंधित बातम्या


Parineeti Chopra : "राजकीय नेत्याशी लग्न..."; खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान परिणीती चोप्राचा 'तो' व्हिडीओ व्हायरल