Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथे हे दोघे शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. अनेकांना परिणीती आणि राघव यांच्या कुटुंबाबद्दल माहित नसेल, जाणून घेऊयात चड्ढा आणि चोप्रा या कुटुंबाबद्दल ...
आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा हे पंजाबी कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचे वडील सुनील चढ्ढा हे व्यापारी आहेत, तर आई अलका या गृहिणी आहेत. राघव चढ्ढा यांनी दिल्लीमधील शाळेतून शिक्षण घेतले आहे. राघव चढ्ढा यांनी दिल्ली विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. त्यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून EMBA कोर्स केला आहे. राजकारणात येण्यापूर्वी राघव चढ्ढा हे चार्टर्ड अकाउंटंट होते.
परिणीतीचे वडील पवन चोप्रा अंबाला कॅन्टमध्ये सप्लायचा व्यवसाय करतात. परिणीतीची आई रीना मल्होत्रा गृहिणी आतहे. त्या सिंगापूरच्या रहिवासी आहेत.
परिणीती आणि राघव हे जोडपे 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस' येथे सात फेरे घेतील. यानंतर हे जोडपे 30 सप्टेंबर रोजी 'ताज लेक' येथे त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी देणार आहेत. 23 सप्टेंबर रोजी पाहुण्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
उदयपूरच्या ताज लीला पॅलेस हॉटेलमध्ये 24 सप्टेंबरला सकाळपासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्नाचे विधी सुरू होतील. दुपारी 1.00 वाजता वर राघव चड्ढा यांच्या सेहराबंदीने लग्नाच्या विधींना सुरुवात होईल, त्यानंतर दुपारी 2.00 वाजता लग्नाच्या वरातीचे आयोजन केले जाईल. परिणीतीच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीमध्ये साखरपुडा झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच अनेक दिग्गज मंडळींनी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
संबंधित बातम्या: