Pradeep Sarkar: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप सरकार हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचे डायलिसिसही सुरू होते. प्रदीप सरकार यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे रात्री तीन वाजता त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आणि 3.30 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. आज दुपारी चार वाजता सुमारास सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रदीप सरकार यांचे चित्रपट
2006 मध्ये रिलीज झालेल्या 'परिणीता' या चित्रपटामधून प्रदीप सरकार यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त आणि सैफ अली खान यांनी काम केलं. हेलीकॉप्टर ईला, लागा चुनरी में दाग : जर्नी ऑफ अ वूमन, लफंगे परिंदे, मर्दानी यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. त्यांनी कोल्ड लस्सी और चिकन मसाला (2019), अरेंज्ड मॅरेज अँड फॉरबिडन लव्ह (2020) आणि दुरंगा (2022) यासारख्या अनेक वेब सीरिजचे दिग्दर्शन केले.
फिल्म मेकर हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्टवर पोस्ट शेअर करुन प्रदीप सरकार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हंसल मेहता यांनी ट्विटरवर प्रदीप यांचा फोटो शेअर करुन लिहिलं, 'प्रदीप सरकार दादा. तुमच्या आत्म्याला शांती लाभो' प्रदीप सरकार हे प्रिया राजवंश या बायोपिकवर काम करत होते.
अभिनेत्री नीतू चंद्रानं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदीप सरकार यांना श्रद्धांजली वाहिली.
अभिनेता अजय देवगणनं ट्विटरवर ट्वीट करत लिहिलं, 'प्रदीप सरकार हे आपल्याला सोडून गेले आहोत, हे आपल्यापैकी अनेकांना अजूनही खरे वाटत नाही. दादा तुमच्या आत्म्याला शांती लाभो'
महत्वाच्या इतर बातम्या :