Pankaj Udhas Love Story : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पंकज उधास यांनी आपल्या गायनातून संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य केले. प्रेमात पडलेल्या तरुण-तरुणींसाठी पंकज उधास यांच्या आवाजातील गझल, गीते म्हणजे भावनांचे प्रतिबिंबच. या प्रेमात पडलेल्या तरुणाईच्या भावनांना वाट करून देणारे पंकज उधास यांनीदेखील आपल्या धर्माच्या भिंती तोडून प्रेमविवाह केला. एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी अशी त्यांची लव्ह स्टोरी आहे.
पंकज उधास यांची लव्ह स्टोरी..
पंकजची प्रेमकहाणी 70 च्या दशकात सुरू झाली. त्याच्या प्रेमकथेत त्याच्या शेजाऱ्याची मोठी भूमिका होती. त्यांच्या शेजाऱ्यानेच पंकज उधास यांची पत्नी फरीदाशी पहिल्यांदा ओळख करून दिली. त्यावेळी पंकज उधास पदवीचे शिक्षण घेत होते. त्याच वेळी फरीदा या एअर हॉस्टेस होत्या.
शेजाऱ्याने करून दिलेल्या भेटीतून पंकज आणि फरीदा यांची मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. सतत एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.
प्रेमाच्या आड आली धर्माची भिंत...
दोघांनीही लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघांमध्ये धर्माची भिंत आली होती. वास्तविक, पंकज उधास हिंदू आणि फरीदा पारशी कुटुंबातील होती. अशा परिस्थितीत त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
पंकज उधास यांचे निधन
आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas Passed Away) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पंकज उधास यांचे कुटुंब या नात्याने खूश होते पण फरीदाचे कुटुंब त्यांच्या लग्नावर खुश नव्हते. मात्र इथे दोन्ही कुटुंबांच्या संमतीनेच पंकज उधास यांना संसार सुरू करायचा होता. त्यामुळे दोघांनीही ठरवलं की, दोन्ही घरच्यांची सहमती असेल तेव्हाच लग्न करायचं. मात्र, काही काळानंतर फरीदाच्या घरच्यांनीही लग्नाला होकार दिला आणि दोघांनीही लग्न केले.