Panchak Official Teaser:  माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  आणि  तिचे पती श्रीराम नेने यांच्या  'पंचक'  या मराठी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत. अनेकांनी या टीझरला कमेंट करुन माधुरीला तिच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


टीझरनं वेधलं लक्ष 


पंचक या चित्रपटाच्या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. या टीझरच्या सुरुवातीला "सुरु करा तुमची सर्कस" हा आदिनाथ कोठारेचा डायलॉग ऐकू येतो. त्यानंतर टीझरमध्ये काही घटना घडलेल्या दिसत आहेत. माधुरीनं सोशल मीडियावर पंचक या चित्रपटाचा टीझर शेअर करुन लिहिलं," खोतांच्या घराला लागलं पंचक, 5 जानेवारीला कळणार, लागणार कोणाचा नंबर?"


टीझरनं नेटकऱ्यांनी केलं कौतुक 


माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पंचक चित्रपटाच्या टीझरला कमेंट करुन अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. "टीझर खूपच छान वाटतोय. आम्ही या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहोत." अशी कमेंट एका नेटकऱ्यानं टीझरला केली आहे. तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, "चांगला टीझर आहे, माधुरी आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा"






'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज


5 जानेवारीला पंचक हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात  आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, विद्याधर जोशी, भारती आचरेकर, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी, संपदा जोगळेकर, आशिष कुलकर्णी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


माधुरी दीक्षित आणि  श्रीराम नेने यांनी ‘15 ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता पंचक या चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केली आहे.   माधुरीनं  बकेट लिस्ट या मराठी चित्रपटामध्ये काम केलं होतं.  


माधुरीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता माधुरीच्या आगामी चित्रपटांची चाहता उत्सुकतेने वाट बघत असतात.


संबंधित बातम्या


Madhuri Dixit Marathi Movie: धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी चित्रपटाची घोषणा! पंचक 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला