Ajinkya Deo: अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी  मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अजिंक्य देव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अजिंक्य देव यांच्या वैयक्तिय आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकतीच अजिंक्य देव यांनी मज्जा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अजिंक्य देव यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल तसेच बालपणीच्या आठवणींबद्दल सांगितलं आहे.


अजिंक्य देव आणि आरती देव यांची लव्ह स्टोरी


अजिंक्य देव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं,  "एकदा मी बाबांना न सांगता गाडी घेऊन कॉलेजमध्ये गेलो. त्यानंतर मी आरतीला गाडीमध्ये बसायला सांगितलं आणि तिला घेऊन मी जुहू बिचवर घेऊन गेलो. तेव्हा मी तेव्हा थरथरत होतो. मी तिला प्रपोज केलं तेव्हा ती रडत होती."


मुलींकडून मिळालेले लव्ह लेटर्स बायकोनी फाडले  


अजिंक्य देव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की कॉलेजमध्ये असताना त्यांना अनेक मुलींकडून लव्ह लेटर्स मिळाले होते. पण नंतर ते त्यांच्या बायकोनं फाडले. कॉलेजच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, "कॉलेजमध्ये होते तेव्हा मला अनेक लव्ह लेटर्स मिळाले होते. बरेच दिवस मी ते लेटर्स  ठेवले होते पण नंतर माझ्या बायकोनीच ते फाडून टाकले. त्या लेटर्समध्ये वाटेल ते लिहिलं होतं. आमच्या कॉलेजमध्ये मुली आणि मुलं फार कमी बोलत होते पण मला तेव्हा खूप लेटर्स मिळत होते. माझी बायको पण त्याच कॉलेजमध्ये होती."


अभिनय नाही तर या क्षेत्रात करायचं होतं करिअर


अजिंक्य देव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्यांना अभिनेता नाही तर पायलट व्हायचं होतं. ते म्हणाले, "मला पायलट व्हायचं होतं. पण ती इच्छा एवढी दृढ नव्हती. मी कॉलेजमध्ये किंवा शाळेत कधीही नाटकामध्ये काम केलं नाही किंवा भाषण दिलं नाही. मी कधीच विचार केला नव्हता की मी अभिनेता होईल." अजिंक्य देव यांनी मुलाखतीमध्ये  सीमा देव आणि रमेश देव यांच्या अनेक आठवणी देखील सांगितल्या.


"आमच्या घरात कधीच पार्ट्या झाल्या नाहीत. आमच्या बाबांना कसलंच व्यसन नव्हतं. आम्ही जुहूमध्ये राहायचो पण लहानपणी मला असं स्टार किड्स असल्यासारखं कधी वाटत नव्हतं. माझी घरी ओळख माहेरची साडी या चित्रपटामुळे निर्माण झाली होती.", असंही अजिंक्य देव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.


संबंधित बातम्या:


Ajinkya Deo : बाळासाहेब ठाकरेंची आज महाराष्ट्राला गरज होती : अजिंक्य देव