मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत'शी टक्कर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 'पॅडमॅन' आता 25 जानेवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
'पॅडमॅन'चं प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे दोन्हीही सिनेमांना फायदा होईल. 'पद्मावत' रिलीज झाल्यानंतर 'पॅडमॅन' जवळपास दोन आठवड्यांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे दोन्हीही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार नाही. दरम्यान, 'पद्मावत'ला देशभरात विविध ठिकाणी विरोध होत आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निर्मात्यांना दिलासा देत सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.
'पद्मावत' सिनेमाला वाढता विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली होती.
या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
सिनेमाला वाढता विरोध लक्षात घेऊन, ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. त्याचसोबत, सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार काही बदलही करण्यात आले. मात्र तरीही सिनेमाला होणारा विरोध कमी झालेला नाही.
संबंधित बातम्या
चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात
केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड
‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर
अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज
'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल
'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार
पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...
म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी