'चंद रोज' हे पल्लवी जोशीच्या आवाजातील गाणं रसिकांची वाहव्वा मिळवत आहे. 'बुद्धा इन अ ट्राफिक जाम' या चित्रपटात पल्लवी अनुपम खेर यांच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेत असून गायनाची जबाबदारीही तिने लीलया पेलली आहे.
'बुद्धा इन अ ट्राफिक जाम' या चित्रपटाची कथा नक्षलवादी, एनजीओ याभोवती फिरते. चित्रपटाचं दिग्दर्शन पल्लवीचे पती विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे.
पल्लवी सध्या 'मेरी आवाज ही पेहचान है' या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यापूर्वी तिने 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाच्या टायटल साँगला आपला आवाज दिला होता. 'रिटा' चित्रपटातील तिची भूमिकाही गाजली होती.
पाहा गाण्याचा व्हिडिओ :