Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा चित्रपट चर्चेत आहे. द वॅक्सीन वॉर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हैदराबादमध्ये द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. द वॅक्सीन वॉरच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे. दुखापत होऊनही पल्लवी जोशीने चित्रपटाचा शॉट पूर्ण केला आणि नंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. आता या सर्व घटनेबाबत आणि पल्लवी यांच्या तब्येतीबाबत विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन पल्लवी जोशी यांच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पल्लवीच्या वतीने, मी सर्व हितचिंतकांचे आणि चाहत्यांचे तिच्याबाबत काळजी दाखवल्याबाबत आभार मानू इच्छितो. शूटिंग सुरु असताना एक कार तिच्या पायावरुन गेली. त्यामुळे हाड बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल. पण पल्लवी तिचा शॉट देण्यासाठी सेटवर परत आली. शो मस्ट गो ऑन." या ट्वीटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशी यांचा एक फोटो देखील शेअर केला.
द वॅक्सीन वॉर 15 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार
15 ऑगस्ट 2023 रोजी द वॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडाही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मिर फाईल्स या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 11 मार्च 2022 रोजी द कश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात पल्लवी जोशी यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली होती. तसेच चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; 'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना