एक दिल.. एक जान.. 'पद्मावती'तील प्रेम-विरह गीत रीलिज
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2017 09:25 PM (IST)
ए एम तुराझ यांनी 'एक दिल है..' गाणं लिहिलं असून स्वतः संजय लीला भन्साळींनीच संगीतबद्ध केलं आहे.
मुंबई : दीपिका पदुकोणच्या 'पद्मावती' चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'एक दिल है.. एक जान है' या गाण्यातून राणी पद्मावती आणि राजा रतन सिंह यांच्यातील अलवार नातं उलगडताना दिसत आहे. 'घुमर'नंतर 'पद्मावती' चित्रपटातलं हे दुसरं गाणं रीलिज झालं आहे. 'एक दिल है.. एक जान है, दोनो तुझपे कुर्बान है' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातूनही भन्साळींनी प्रेक्षकांना व्हिज्युअल ट्रीट दिली आहे. ए एम तुराझ यांनी 'एक दिल है..' गाणं लिहिलं असून स्वतः संजय लीला भन्साळींनीच संगीतबद्ध केलं आहे. शिवम पाठकने हे तरल गाणं गायलं आहे.