मुंबई : पद्मावती चित्रपटाच्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक एकवटले आहेत. पद्मावती सिनेमाला समर्थन दर्शवण्यासाठी आज देशभरात चित्रपटांचं शुटिंग सुरू असलेल्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन करण्यात आलं.
भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिका दिग्दर्शकांच्या संघटनेनं हे आंदोलन केलं. गोरेगावमधील फिल्म सिटीत झालेल्या आंदोलनात कलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन,टेक्निकल स्टाफ असे जवळपास 800 जण सहभागी झाले होते.
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
या आंदोलनात चित्रपट क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळ्या 19 संघटना सहभाग नोंदविला. या सर्वांनी 15 मिनिट शूटिंग बंद ठेऊन आंदोलन केलं.
सिनेमाच्या विरोधात करणी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर काही राजपूत संघटनांनी दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळीला धमकी दिली आहे.
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
दरम्यान, सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फिल्म इंडस्ट्री अपमतलबी असल्याचं वक्तव्यं केलं आहे.
संबंधित बातम्या
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
'पद्मावती'च्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक एकवटले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Nov 2017 05:19 PM (IST)
पद्मावती चित्रपटाच्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक एकवटले आहेत. पद्मावती सिनेमाला समर्थन दर्शवण्यासाठी आज देशभरात चित्रपटांचं शुटिंग सुरू असलेल्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन करण्यात आलं.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -