'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2017 08:45 AM (IST)
पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोनची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'पद्मावती' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. राणी पद्मिनी अर्थात दीपिकाचा फर्स्ट लूक पद्मावती चित्रपटाच्या ऑफिशियल ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. नवरात्राचा मुहूर्त साधत गुरुवारी सुर्योदयाच्या वेळी फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. https://twitter.com/FilmPadmavati/status/910672532130340865 विशेष म्हणजे पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल.