मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनेमाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर जारी केले आहेत. या सिनेमाने परदेशातही चांगली कमाई केली आहे. हा सिनेमा देशभरात 2750 स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पॅडमॅनच्या या कमाईवर संपूर्ण स्टारकास्ट या कमाईवर खुश आहे.
पॅडमॅन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित या सिनेमाचं कथानक आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या अरुणाचलम् या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले.
दरम्यान, अक्षय आणि सोनम एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघांनी 2011मध्ये ‘थँक्यू’ या सिनेमात काम केलं होतं. तर राधिका आपटे पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत काम करणार आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन आर. बाल्की करत असून, निर्मितीची जबाबदारी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने घेतली आहे.
संबंधित बातम्या :
'पॅडमॅन'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई