चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला असला, तरी प्रेक्षकांसाठी 24 जानेवारीच्या संध्याकाळीच पेड प्रीव्ह्यूचं आयोजन करण्यात आलं होतं. एका संध्याकाळच्या पेड प्रीव्ह्यूत 'पद्मावत'ने पाच कोटींची कमाई केली.
बुधवार 24 जानेवारी (पेड प्रीव्ह्यू) - 5 कोटी
गुरुवार 25 जानेवारी (पहिला दिवस)- 19 कोटी
शुक्रवार 26 जानेवारी (दुसरा दिवस)- 32 कोटी
शनिवार 27 जानेवारी (तिसरा दिवस)- 27 कोटी
एकूण कमाई : 83 कोटी
करणी सेनेने जाळपोळ आणि दगडफेक करण्याच्या भ्याड धमक्या दिल्यामुळे बुधवारी पेड प्रीव्ह्यू पाहण्यासाठी प्रेक्षकांनी काहीशी दबकतच सिनेमागृहांची वाट धरली. मात्र त्यानंतर तीन दिवसांत पद्मावतने अपेक्षेनुसार कोट्यवधींची कमाई केली. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
'पद्मावत'चं एक तिकीट हजाराच्या वर आहे. त्यामुळे कुटुंब किंवा मित्र परिवारासोबत जाण्याचा विचार करणाऱ्या प्रेक्षकांच्या खिशाला चांगलाच खड्डा पडत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह सर्वच शहरात तिकीट हजाराच्या वर आहेत. ठाण्यात तर 1 हजार 800 पर्यंत तिकीटाचे दर आहेत. पद्मावत आयमॅक्स 3D मध्ये पाहण्यासाठी काही ठिकाणी 2200 ते 2400 रुपयांचा दर आहे.
रिव्ह्यू: भव्य, रेखीव, नेत्रदीपक - पद्मावत
इतकं असूनही ऑनलाईन तिकीटाची विक्री वाढली आहे. विशेष म्हणजे वीकेंडला तिकीटांची विक्री झाली असून थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत. गुरुवारी चित्रपट रिलीज झाल्यामुळे सिनेमाला गुरुवार ते रविवार असा लाँग (एक्स्टेंडेड) वीकेंड मिळाला आहे. त्यामुळे चार दिवसात हा सिनेमा 100 कोटींचा गल्ला पार करण्याची शक्यता सुरुवातीलाच वर्तवण्यात आली होती.
पद्मावतमध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर रझा मुराद, जिम सर्भ, अदिती राव हैदरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी अल्लाउद्दीन खिल्जी साकारणाऱ्या रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
पद्मावती ते पद्मावत
राजपूत करणी सेनेने देशभर विरोध केल्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटाचं नाव बदलून 'पद्मावत' आणि काही दृश्यांत बदल केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं. 'Padmavati' पासून सुरु झालेला या टायटलचा प्रवास व्हाया 'Padmavat' आता 'Padmaavat' वर पोहचला.
पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली होती. हा चित्रपट ऐतिहासिक नसून, पद्मावत ही काल्पनिक कलाकृती या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले होते.
सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं होतं.
पद्मावतचा वाद
करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती' संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला.
हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी सहा सदस्यीय समितीला निमंत्रित केलं होतं. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं.
'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.
घूमरचं नवं व्हर्जन
दीपिकाच्या ‘घूमर’ गाण्याचंही नवं व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय यूट्यूबवरुनही जुनं गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.
चार राज्यांचा विरोध
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा या चार राज्यांनी सिनेमाच्या रीलिजवर बंदी घातली. याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यावर कोर्टाने ही बंदी अवैध असल्याचं सांगितलं. 'पद्मावत' प्रदर्शित झाल्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. अखेर 25 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट 'पद्मावत' नावाने प्रदर्शित झाला.
दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत
राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरी, रझा मुराद, जिम सर्भही या चित्रपटात झळकले आहेत.
रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
संबंधित बातम्या
पहिल्या दिवशी 'पद्मावत' चित्रपटाची कमाई किती?
संजय लीला भन्साळीच्या आईवर सिनेमा काढणार, करणी सेनेची घोषणा
'पद्मावत'लाही पायरसीची कीड, संपूर्ण सिनेमा फेसबुकवर लीक
कोणत्याही ‘कट’शिवाय ‘पद्मावत’ला पाकिस्तानात परवानगी
राजा रावल रतन सिंहसाठी शाहरुखने किती मानधन मागितलं?
कुठे 2400 तर कुठे 1500 रुपये तिकीट, विरोध झुगारुन 'पद्मावत'ला गर्दी
या’ चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित करणार नाही : मल्टिप्लेक्स असोसिएशन
‘पद्मावत’ शाहिद कपूरसाठी ‘गेम चेंजर’?
'पद्मावत' सिनेमाच्या पाठिंब्यावरुन मनसेमध्ये फूट
'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध चुकीचा, मनसेचा पाठिंबा
‘पद्मावत’च्या रिलीजआधी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
'पद्मावत' देशभरात रिलीज होणार!
'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध कायम, 25 जानेवारीला 'भारत बंद'ची हाक
'घूमर' गाणं नव्याने रिलीज, दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन
'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी
'पद्मावत'च्या निर्मात्यांना दिलासा, सर्व राज्यात प्रदर्शित होणार!
चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात
केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड
‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर
अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज
'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल
'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार
म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी
‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात
‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज
सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली
‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर
एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज
रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं