OTT Release Weekend :  सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांचा ओढा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येत आहे. जून महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेब सीरिज लाँच (OTT Release Weekend) होणार आहेत.  या आठवड्यात (3 June-9 June) ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'गुल्लक 4' ते  बडे मियाँ छोटे मियाँ' असे वेब सीरिज, चित्रपट रिलीज होणार आहेत. 


>> या आठवड्यात ओटीटीवर काय रिलीज होणार?


गुनाह - Gunaah Web Series 


सुरभी ज्योती आणि गश्मीर महाजनी यांच्या गुनाह या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. लोकांची याला चांगली पसंती मिळाली. गश्मीर आणि सुरभीच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज आहे. 


कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 


गुनाह ही वेब सीरिज 'डिस्नी प्लस हॉटस्टार' या ओटीटीवर रिलीज होणार आहे. 



द लिजेंड ऑफ हनुमान-सीझन 4  The Legend Of Hanuman Season 4 


सलग तीन हिट सीझननंतर, आता 'द लिजेंड ऑफ हनुमान'चा चौथा सीझन रिलीज होणार आहे. चाहते या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत होते. या सीरिजमध्ये  हनुमानाची गाथा आणि प्रभू राम यांच्यासोबतचे त्यांचे जीवन हे जबरदस्त ॲनिमेशन आणि इफेक्टसह दाखवण्यात आले. आता चौथ्या सीझनमध्ये  सीतेसाठी राम आणि रावणाचे युद्ध आणि लंकेचा नाश दाखवण्यात येणार आहे.


कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 


'द लिजेंड ऑफ हनुमान-सीझन 4' ही वेब सीरिज 4 जून रोजी 'डिस्ने प्लस हॉट स्टार'वर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 


गुल्लक 4 Gullak 4 Web Series 


सुपरहिट वेब सीरिज गुल्लकचा चौथा सीझन रिलीज होणार आहे. मिश्राजींचा धाकटा मुलगा अमन याच्या भोवती वेब सीरिजचे कथानक असणार आहे. अमन आता वयात येत असून पौगंडावस्थेत त्याच्यात होणारे बदल दिसणार आहेत.तर,  मिश्राजींचा मोठा मुलगा आता घराचा भार स्वत: च्या खांद्यावर घेणार आहे. गुल्लकच्या आधीच्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 


कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 


'गुल्लक' वेब सीरिज ही सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 जून रोजी रिलीज होणार आहे. 


'बडे मियाँ छोटे मियाँ' Bade Miyan Chote Miyan


अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ'हा अॅक्शनपट  आता ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.  त्यानंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली होती. 


कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 


हा चित्रपट 6 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे. 


स्टार वॉर्स: अकोलाइट Star Wars: The Acolyte


साय-फाय फिक्शन सीरिज Star Wars: The Acolyte प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजची गोष्ट 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या  Star Wars: Episode I – The Phantom Menace (1999) च्या 100 वर्ष आधीच्या घडामोडीवर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  जेडी मास्टर हा सतत होत असलेल्या गुन्हेगारी कारवायांच्या मूळापर्यंत जाऊन त्याची कारणे, सूत्रधार कोण याचा शोध घेण्याच्या मिशनवर आहे. 


कोणत्या ओटीटीवर कधी होणार रिलीज? 


ही वेब सीरिज 4 जून रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.