OTT Release this week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील पंचायतच्या दुसऱ्या सीझनपासून ते अटॅकच्या पहिल्या भागापर्यंत अनेक वेब सीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. मागील आठवड्यातदेखील अनेक सिनेमांनी धुमाकूळ घातला होता.
पंचायत सीझन 2 : 2020 मध्ये पंचायतच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं होतं. त्यामुळे प्रेक्षक या सीझनच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. 'पंचायत' वेब सीरिजचा दुसरा सीझन 20 मे 2022 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. पंचायत सीरिच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि सीरिजचे कथानक या गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. त्यामुळे आता दुसऱ्या सीझनची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.
12th मॅन : 12th मॅन' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. मोहनलाल व्यतिरिक्त या सिनेमात उन्नी मुकुंदन, शिवदा, अनुश्री, अनु सिथारा, सैजू कुरुप, राहुल माधव, आदिती रवी, प्रियंका नायर, लियोना लिशोय, अनु मोहन, चंदू नाथ, नंदू आणि प्रदीप चंद्रन हे कलाकारदेखील दिसून येणार आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
अटॅक : 'अटॅक' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 27 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. जॉन व्यतिरिक्त या सिनेमात जॅकलीन फर्नांडीज, रकुल प्रीत सिंहदेखील आहेत.
स्ट्रेंजर थिंग्स सीझन 4 : 'स्ट्रेंजर थिंग्स' या गाजलेल्या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. 2016 साली या वेब सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 27 मे 2022 रोजी या वेब सीरिजचा चौथा सीझन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या