OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील आशिकाना, मिस मार्वल, अर्ध, कोड एम सीझन 2, ब्रोकन न्यूजसारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आशिकाना कधी होणार प्रदर्शित? 6 जूनकुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार

'आशिकाना' या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना रोमान्स आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे. ही वेबसीरिज 6 जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. गुल खान यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये जैन इबाद खान आणि खुशी दुबे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

मिस मार्वलकधी होणार प्रदर्शित? 8 जूनकुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार

मार्वल स्टुडिओची बहुप्रतिक्षित 'मिस मार्वल' ही वेबसीरिजदेखील या आठवड्यात रिलीज होणार आहे. 8 जूनपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. सहा भागांची ही वेब सीरिज इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अर्धकधी होणार प्रदर्शित? 10 जूनकुठे होणार प्रदर्शित? झी 5

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव आणि अभिनेत्री रुबिना दिलैकचा अर्ध हा सिनेमादेखील या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 10 जूनपासून प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या सिनेमात अभिनेता राजपाल यादव पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

कोड एम सीझन 2कधी होणार प्रदर्शित? 9 जूनकुठे होणार प्रदर्शित? वूट

अभिनेत्री जेनिफर विंगेटची बहुप्रतिक्षित वेब सीरिज कोड एमचा दुसरा सीझन या आठवड्यात 9 जूनपासून वूटवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीझनमध्येही जेनिफर विंगेट मिशन पूर्ण करताना दिसणार आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 

ब्रोकन न्यूजकधी होणार प्रदर्शित? 10 जूनकुठे होणार प्रदर्शित? झी 5

ब्रोकन न्यूज या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ही वेबसीरिज 10 जूनपासून झी 5 वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये सोनाली बेंद्रे पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

OTT Release this week : 'या' आठवड्यात 'हे' सिनेमे आणि वेब सीरिज ओटीटीवर होणार प्रदर्शित

OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'या' वेब सीरिज आणि सिनेमे