OTT Release This Week : ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी जुलैचा महिना खूप खास आहे. एकीकडे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला 'मिर्झापूर', 'कोटा फॅक्टरी'चा पुढील सीझन भेटीला आला. या आठवड्यातही (15 ते 21 जुलै) ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला वेब सीरिज चित्रपट येणार आहेत.
या आठवड्यात मानव कौल, 'पंचायत' फेम फैसल मलिक आणि तिलोत्तमा शोम यांचा 'त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेब सीरिज 'कोब्रा काई'चा शेवटचा सीझन OTT प्रेक्षकांसाठी रिलीज होणार आहे.
त्रिभुवन मिश्रा CA टॉपर (Tribhuvan Mishra CA Topper)
त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर या चित्रपटात मानव कौल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मानव कौल चार्टर्ड अकाउंटेंटची भूमिका साकारत आहे. दोन मुलांचा बाप असलेला हा सीए कर्ज फेडण्यासाठी एस्कॉर्ट होतो. सामान्य कथा असलेल्या या वेब सीरिजमध्ये एक वळण येते. एका अंडरवर्ल्ड गँगस्टरची पत्नी ही आपली ग्राहक असल्याचे त्याला समजते. त्यानंतर स्वत:चा बचाव करण्यासाठी तो वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतो. पण, त्याच्या अडचणीत वाढ होते. त्रिभुवनच्या या स्टोरीमध्ये कॉमेडी आहे पण थ्रिल आणि ड्रामादेखील आहे.
या वेब सीरिजमध्ये शुभ्रज्योती बारात, श्वेता बसू प्रसाद, तिलोत्तमा शोम, सुमित गुलाटी आणि नरेश गोसाई यांचाही समावेश आहे.
कधी आणि कुठे पाहाल? ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 18 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
नागेंद्रन'स हनिमून (Nagendran’s Honeymoons)
Nagendran’s Honeymoons ही एक रोमँटिक मल्याळम कॉमेडी सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये सूरज वेंजरामुडू मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजची गोष्ट नागेंद्रन नावाच्या एका आळशी व्यक्तीच्या भोवती फिरते. आखाती देशात जाण्याचे त्याचे स्वप्न असते. त्यासाठी पैसे जमवण्यासाठी एक प्लान तो तयार करतो. आपण लग्न करू आणि हुंडा मिळेल असा त्याचा कयास असतो. मात्र, या दरम्यान काही मजेदार घडामोडी घडतात.
कुठे आणि कधी पाहाल? ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 19 जुलै रोजी रिलीज होईल.
द ग्रीन ग्लोव्ह गँग सीझन-2 (The Green Glove Gang season 2)
2022 मध्ये रिलीज झालेली पोलिश वेब सीरिज 'द ग्रीन ग्लोव्ह गँग'चा सिक्वेल आहे. झुझा, किंगा आणि एलिझा या नव्या सीझनमध्ये परतले आहेत. चोरलेले हातमोजे सोडून तिघेही डोंगरात लपले आहेत. मात्र, झुझाचा मुलगा एका कुख्यात गुंडाशी संघर्ष करतो.
कुठे आणि कधी पाहाल? ही वेब सीरिज 17 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
कोब्रा काई सीझन 6 पार्ट-1
कोब्रा काई आता शेवटचा सीझन 6 वर पोहोचला आहे. या शेवटच्या सीझनचे तीन भाग असणार आहेत. त्यापैकी पहिला भाग या आठवड्यात रिलीज होत आहे. डॅनियल लारुसो आणि जॉनी लॉरेन्स त्यांच्या विद्यार्थ्यांना सेकाई ताईकई येथे अंतिम लढाईसाठी तयार करतात. जॉन क्रेझ सूड घेण्यासाठी पुन्हा उभा आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर, जागतिक स्तरावर कोब्रा काईचे वर्चस्व पुन्हा मिळवणे हे क्रेजचे ध्येय आहे. दुसरीकडे गेल्या सीझनमध्ये पराभूत होऊनही टेरी सिल्व्हरलाही पुनरागमनाचा धोका आहे.
कधी आणि कुठे पाहाल? ही वेब सीरिज 18 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे.
मास्टर ऑफ द हाऊस Master of the House
के-ड्रामाच्या चाहत्यांसाठी या आठवड्यात Master of the House ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. महत्त्वाकांक्षा, प्रामाणिकपणा आणि विश्वासघात यांची ही गोष्ट आहे. या सीरिजची सुरुवात रुंगरोजच्या मृत्यूने होते. हा एक व्यावसायिक असतो. त्याने नुकतंच आपली घरकामगार कैमुकसोबत विवाह केला आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या अब्जावधींच्या हिरे व्यापाराच्या साम्राज्यावर संकट निर्माण होते. अनेकांना या साम्राज्यावर ताबा घ्यायचा आहे. त्यासाठी संघर्षही होतो. मात्र, त्याचसोबत एक ट्वीस्टही येतो.
कधी आणि कुठे पाहाल? ही वेब सीरिज 18 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
माय स्पाय: द इटरनल सिटी (My Spy : The Eternal City)
2020 च्या 'माय स्पाय'चा रोमांचक सिक्वेल 'द इटरनल सिटी' या आठवड्यात रिलीज होत आहे. कथा सीआयए ऑपरेटिव्ह जेजे (डेव्ह बॅतिस्ता) आणि त्याची तरुण जोडीदार सोफी (क्लो कोलमन) पुन्हा एकत्र आणते. यावेळी, सोफीने जेजेला तिच्या हायस्कूलच्या गायकांच्या इटली टूरवर सोबत येण्यास राजी करते. कथा उलगडत असताना, दोघे सीआयए प्रमुख डेव्हिड किम आणि त्यांचा मुलगा कॉलिन यांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कटात अडकलेले दिसतात.
कधी आणि कुठे पाहाल? ही वेब सीरिज 18 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.
आयएसएस
आयएसएसच्या कथानकात अंतराळातील जग आहे. या ठिकाणचे भवितव्य धोक्यात आहे. पृथ्वीवर अणूयुद्ध सुरू झाल्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अमेरिकन आणि रशियन अंतराळवीरांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. यामुळे अंतराळ स्थानकातील वातावरण संशय आणि संघर्षात बदलते.
कधी आणि कुठे पाहाल? ही वेब सीरिज 19 जुलै रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.
फाइंड मी फॉलिंग Find Me Falling
Find Me Falling ही मजेदार रोमँटिक कॉमेडी आहे. हॅरी कॉनिक ज्युनियरने जॉन ऑलमनची भूमिका साकारली आहे. हा एक वृद्ध रॉक स्टार आहे जो त्याच्या संगीत क्षेत्रातील घसरती लोकप्रियता आणि त्याच्या कमबॅक अल्बमच्या फ्लॉपमुळे चिंतेत पडला आहे.
नवीन सुरुवात करण्याच्या शोधात तो सायप्रसमधील एका बेटावरील किनाऱ्यावर असलेल्या घरात जातो. मात्र, त्या ठिकाणी जॉनचा मुकाबला काही आंगतुक पाहुण्यांशी होतो. त्यापैकी एक म्हणजे त्याची एक्स गर्लफ्रेंड सिया असते. सियाची भूमिका अग्नि स्कॉटने केली आहे.
कधी आणि कुठे पाहाल? हा चित्रपट 19 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
स्वीट होम सीझन 3
Sweet Home season 3 मध्ये, मानव, भुते आणि नव-मानव यांच्यातील तणाव शिगेला पोहोचणार आहे. ही मालिका चा ह्यून-सू आणि त्याच्या साथीदारांची दुःखद कथा सांगते. जगातील प्रत्येकजण राक्षस बनत असताना ते जगण्यासाठी संघर्ष करतात. वेब सीरिजच्या सीझन 2 मधील धक्कादायक ट्वीस्टनंतर ह्युन-सूला अंतर्गत लढाईचा सामना करावा लागतो.
कधी आणि कुठे पाहाल? ही वेब सीरिज 19 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.