Top 10 Movies Premier On OTT : गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत. यात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमासह थलापथी विजयच्या (Thalapathi Vijay) 'वरिसु'पर्यंत (Varisu) अनेक सिनेमांचा समावेश आहे. 


'पठाण' (Pathaan) : 


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता हा सिनेमा 25 एप्रिलला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 


वरिसु (Varisu) :


थलापती विजयचा 'वरिसु' हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. विशेष म्हणजे हिंदीतही हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


विक्रम वेधा (Vikram Vedha) :


ऋतिक रोशन आणि सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. पण आता लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


भेडिया (Bhediya) :


कृती सेनन आणि वरुण धवनचा आगामी 'भेडिया' हा सिनेमा आता जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या कॉमेडी भयपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


कुत्ते (Kuttey) :


अर्जुन कपूरचा 'कुत्ते' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकलेला नाही. पण आता हा सिनेमा 16 मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


खूफिया (Khufia) :


तब्बू आणि अली फजला 'खूफिया' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तब्बू एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


कैथल (Kathal) :


सान्या मल्होत्राचा 'कैथल' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. पण या सिनेमात सान्य मल्होत्रा एका पोलीस अधिकाऱ्या भूमिकेत दिसणार आहे. 


गॅसलाइट (Gaslight) :


सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा आगामी 'गॅसलाइट' हा सिनेमा 31 मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सारा आणि विक्रांतने पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. 


चकदा एक्सप्रेस (Chakda Express) :


अनुष्का शर्माचा आगामी 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अनुष्का 'झूलन गोस्वामी'च्या भूमिकेत झळकणार आहे. 


चोर निकल के भागा (Chor Nikal Ke Bhaga) :


यामी गौतम आणि सनी कौशलचा 'चोर निकल के भागा' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 24 मार्चपासून हा सिनेमा प्रेक्षक पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 14 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!