All That Breathes Oscars 2023 : मनोरंजनसृष्टीसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळा धामधुमीत पार पडला. 95 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत आहे. पण आता ऑस्करच्या शर्यतीतून भारताचा 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) हा माहितीपट बाहेर पडला आहे.
ऑस्कर पुरस्कार 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत 'नैवेल्नी'ने (Navalny) ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत 'ऑल दॅट ब्रीथ्स'या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले आहे.
शौनर सेनच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये 'डॉक्टुमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं. दिल्लीत राहणाऱ्या मोहम्मद सौद आणि नदीम शहजाद या दोन भावंडांची कथा या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. दोन भावडांनी जखमी पक्ष्यांना, गरुंडांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपलं जीवन कसं समर्पित केलं हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे.
'ऑल दॅट ब्रीथ्स'सह 'ऑल द ब्यूटी अॅन्ड द ब्लडशेड', 'फायर ऑफ लव्ह', 'अ हाउस मेड ऑफ स्प्लिंटर्स' आणि 'नवलनी' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'डॉक्टुमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं.
'ऑस्कर 2023'मध्ये दीपिकाचा जलवा (Deepika Padukone On Oscars 2023)
'ऑस्कर 2023'च्या (Oscars 2023) प्रेझेंटरच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) समावेश झाला आहे. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. कलाविश्व आणि सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. दिग्गज कलाकारांपासून ते बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान आहे.
भारतात ऑस्कर 2023 हा पुरस्कार सोहळा तुम्ही एबीसी नेटवर्क केबल, सीलिंग टीव्ही, हुलू प्लस लाईव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर पाहू शकता. ऑस्करच्या ट्विटर हँडलवर तुम्ही या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट्स पाहू शकता. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट्स तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवर देखील मिळतील.
संबंधित बातम्या