Oscar Awards 2023: 95 व्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. कारण एसएस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' ला  (Naatu Naatu) ऑस्कर 2023 साठी बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. तसेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही प्रेजेंटर म्हणून या पुरस्कार सोहळ्यात हजर झाली आहे. दीपिका आणि आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला. आरआरआर चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या टीमनं रेड कार्पेटवर वॉक केला. तर दीपिकानं ऑस्कर 2023 साठी केलेल्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 


आरआरआर चित्रपटाच्या टीमचा खास लूक 


आरआरआर चित्रपटातील अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक लूक केला. तर दिग्दर्शक एसएस राजामौली हे जांभळा कुर्ता आणि धोती अशा ट्रेडिशन लूकमध्ये दिसले. राम चरणची पत्नी उपासनानं देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याचे गायक काळ भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला. एम एम कीरावानी आणि त्यांच्या पत्नीनं देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. 














दीपिकाचा स्टनिंग लूक


दीपिकानं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला. तसेच तिनं एक खास नेकपिस देखील परिधान केला होता. दीपिकानं तिच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन तिला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रेझेंटर म्हणून दीपिकानं या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscars 2023 : भारत इतिहास रचणार? 'ऑस्कर'मध्ये पहिल्यांदाच मिळाली 3 नॉमिनेशन, वाचा सविस्तर