Douglas Mcgrath Passes Away : ऑस्कर (Oscar) नामांकित लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते डग्लस मॅकग्रा (Douglas Mcgrath) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अखेरचा श्वास घेतला. 'एवरीथिंग इज फाइन' (Everything is Fine) या त्यांच्या निर्मितीसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'एवरीथिंग इज फाइन' या संस्थेच्या न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. 


डग्लस मॅकग्रा यांच्या पश्चात पत्नी जेन रीड मार्टिन आणि मुलगा हेन्री मॅकग्रा आहे. डग्लस मॅकग्रा यांनी नाटकांसह हॉलिवूडमध्येदेखील काम केलं आहे. डग्लस मॅकग्रा यांना ब्युटीफुल: द कॅरोल किंग म्युझिकल या पुस्तकासाठी टोनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 'बुलेट्स ओव्हर ब्रॉडवे' या  पटकथेसाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. 


डग्लस मॅकग्रा यांनी 'एम्मा', 'निकोलस निकेलबी', 'कंपनी मॅन', 'इनफेमस' अशा अनेक सिनेमांच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच एमी नॉमिनेटेड 'हिस वे' आणि 'बिकमिंग माइक निकोल्स' या माहितीपटाचं दिग्दर्शनदेखील केलं आहे. डग्लस मॅकग्रा यांच्या निधनाने अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. अनेक दर्जेदार सिनेमांच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासोबत त्यांनी निर्मितीदेखील केली आहे. त्यांच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे.






डग्लस मॅकग्रा कोण आहेत? 


डग्लस मॅकग्रा हे अमेरिकन पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते होते. त्यांनी अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. तसेच एमी पुरस्कारासाठी नामांकनांसह विविध पुरस्कारदेखील डग्लस यांनी आपल्या नावे केले आहेत. 






संबंधित बातम्या


Priyanka Chopra : माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची : प्रियांका चोप्रा