Oscar 2023 After Party: 'आरआरआर' (RRR) या दाक्षिणात्य चित्रपटामधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याने ऑस्कर-2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग कॅटेरगरीमधील पुरस्कार जिंकला. 'आरआरआर' या चित्रपटाने भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता ऑस्कर पुरस्कार जिंकल्याने जगभरातील लोक आरआरआर या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत आहेत. ऑस्कर जिंकल्यानंतर आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी त्यांच्या लॉस एंजेलिस येथील घरी एका पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला आरआरआर चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. 


एस.एस राजामौली यांच्या घरी 'आरआरआर'च्या टीमची पार्टी


सोमवारी रात्री  एस.एस राजामौली यांनी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी नाटू नाटूच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीचे फोटो सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.


उपासनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये राम चरण हा आरआरआर या चित्रपटाला मिळालेल्या ट्रॉफीसोबत पोज देताना दिसत आहे. तसेच उपासनाने पार्टीमधील शेअर केलेल्या एका फोटोमध्ये नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम किरवाणी हे पियानो वाजवताना दिसत आहेत. उपासनाने शेअर केलेले या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


पाहा फोटो 







ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी 'आरआरआर' च्या टीमचा खास लूक


आरआरआर चित्रपटातील अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक लूक केला होता. तर दिग्दर्शक एसएस राजामौली हे जांभळा कुर्ता आणि धोती अशा ट्रेडिशन लूकमध्ये दिसले. राम चरणची पत्नी उपासनाने देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याचे गायक काळ भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. 






आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscar Awards 2023: भारतासाठी अभिमानाचा क्षण; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू'वर परफॉर्मन्स, प्रेक्षकांकडून 'स्टँडिंग ओव्हेशन'!