उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात काठी खेडा गावात राहणाऱ्या स्नेह नावाच्या युवतीवर हा माहितीपट तयार करण्यात आला. भारतीय चित्रपट निर्मात्या गुनीत मोंगा यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. 35 वर्षीय गुनीत मोंगा यांनी द लंचबॉक्स, मसान, जुबान यासारख्या बॉलिवूडपटांची निर्मिती केली आहे. रयाक्ता जहताबची आणि मेलिसा बर्टन यांनी दिग्दर्शन केलं आहे.
हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री जाहीर झालेल्या 91 व्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात 'पीरियड. एन्ड ऑफ सेन्टेंस'ला पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर यूपीतील काठी खेडा गावात एकच जल्लोष झाला.
अॅण्ड ऑस्कर गोज टू...ग्रीन बुक...
नऊ लघु माहितीपटांना या विभागात नामांकन मिळालं होतं. समाजात मासिक पाळीकडे पाहण्याचा तुच्छ दृष्टीकोन या माहितीपटात अधोरेखित करण्यात आला आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला आहे. स्नेहने गावातील मैत्रिणींसोबतच सॅनिटरी पॅड निर्मितीचा कारखाना तयार केला.
'हा आपला विजय आहे! या जगातील प्रत्येक युवतीने मनाशी खूणगाठ बांधावी, की ती देवी आहे. आपण @sikhya ला जगाच्या नकाशात ओळख मिळवून दिली' असं ट्वीट गुनीत मोंगा यांनी केलं आहे.