Oh My God 2 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एकामागोमाग चित्रपटांचा धडाकाच लावला आहे. मागील काही दिवसांत त्याच्या जवळपास तीन ते चार चित्रपटांच्या घोषणा झाल्या आहेत. यात आणखी एकाची भर पडली आहे. अक्षय कुमारने त्याच्या ओ माय गॉड 2 (OMG 2) या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केलं आहे. अक्षय कुमार एका पोस्टरवर भगवान शिवाच्या स्वरुपात दिसत आहे.


पहिल्या पोस्टरमध्ये अक्षय निळ्या रंगात दिसत आहे, त्याचे डोळे बंद आहेत आणि केस ड्रेडलॉकमध्ये आहेत. एका शालेय विद्यार्थी छायचित्राशी तळाशी बसलेला दिसत आहे आणि पोस्टरवर ‘रख विश्वास, तू है शिव का दास’ असे शब्द लिहिलेले आहेत. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये एक निळा हात दिसतोय, बहुधा देवाचा आहे, ज्याने तरुण मुलाचा हात धरलेला आहे.


अक्षयने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “'कर्ता करे ना कर के शिव करे सो होये'. #OMG2 साठी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत, एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर विचार करण्याचा आमचा प्रामाणिक आणि नम्र प्रयत्न. आदियोगीची शाश्वत उर्जा या प्रवासातून आम्हाला आशीर्वाद देवो. हर हर महादेव."






या चित्रपटात यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अमित राय यांनी सप्टेंबरमध्ये मुंबईत या सोशल कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं आहे. पंकज त्रिपाठीने चित्रपटाच्या त्याच्या भागाचे शूटिंग सुरू केलं असून ऑक्टोबरमध्ये अक्षय त्याच्यासोबत साहभागी होणार होता.


अहवालात एका सोर्सचा हवाला देऊन म्हटले आहे, “पहिला चित्रपट धर्मावर आधारित असताना, ओह माय गॉड 2 भारतीय शिक्षण प्रणालीवर आधारित असेल. पंकज त्रिपाठी नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. स्त्रोताने पुढे सांगितले की, “चित्रपटाची कथा अशा प्रकारे तयार केली गेली आहे की ती अक्षयच्या पात्राच्या सहभागासाठी योग्य राहिल. या चित्रपटात परीक्षेचे दडपण आणि महाविद्यालयीन प्रवेश यांसारख्या विषयांचाही शोध घेतला जाईल.”


महाकालेश्वर मंदिर परिसरातही शूटिंग होणार
अभिनेता अक्षय कुमारच्या ओ माय गॉड 2 या चित्रपटाचे चित्रीकरण गुरुवारी रामघाट आणि दत्त आखाडा घाट येथे झाले. एडीएम संतोष टागोर यांनी माहिती दिली की चित्रपटाच्या युनिटला उज्जैन शहरातील विविध ठिकाणी 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाकालेश्वर मंदिर परिसरातही होणार आहे. यामुळे भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. पूर्वीप्रमाणेच, त्यांना त्यांच्या आराधनेचे दर्शन घेता येईल.