बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा त्यांच्या सुपर हिट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाला नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. 26 वर्षानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट ब्रॉडवे  म्यूझिकल म्हणजेच संगितीकेच्या रुपात सादर करणार आहेत. या  म्यूझिकल प्लेमधून आदित्य चोप्रा हे ब्रॉडवेवर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. हा म्यूझिकल प्ले लॉरेंस ऑलिवर पुरस्कार विजेता नेल बेंजामिन यांच्या पुस्तकावर आणि गाण्यांवर आधारलेला असेल. तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी हे या म्यूझिकल प्लेला संगीत देणार आहेत. याबाबत यशराज फिल्म्स ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर  केली आहे. ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्यूजिकल' असं नाव या संगितीकेचं नाव असणार आहे.  ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्यूजिकल' (Come Fall In Love - The DDLJ Musical) चा प्रिमियर अमेरिकेच्या सेन डिएगोमधील ग्लोब थिएटरमध्ये होणार आहे.


26 वर्षांपूर्वी म्हणजे 1995 मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने इतिहास घडवला. हा सिनेमा आजही तरुणाईला भुरळ घालत आहे. सध्याच्या मोबाईल, यूट्यूब आणि ओटीटीच्या जमान्यातही गेली 26 वर्षे हा सिनेमा मुंबईतील मराठा मंदिर सिनेमा हॉलमध्ये दाखवला जात आहे. 


गेली दीड वर्षे कोरोना लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद असली तरी काल पासून सिनेमा हॉल सुरु झाल्यावर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पुन्हा थिएटरमध्ये दाखवला जाईल असं मराठा मंदिरच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं. 


दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाने फक्त आदित्य चोप्राला सिनेमासृष्टीत ओळख मिळवून दिली असं नाही तर त्यावेळच्या आणि आताच्याही तरुणाईच्या प्रेमाला अभिव्यक्ती दिली. त्यामुळेच हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. आदित्य चोप्राने त्याची ही क्लासिक गणली केलेली कलाकृती आता ब्रॉडवे वर सादर करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील वर्षी तो ब्रॉडवेवर हा सिनेमा संगितीकेच्या स्वरुपात सादर होईल. आदित्य चोप्रा या प्रोजेक्टवर गेल्या तीन वर्षांपासून काम करत होते, असं यशराज फिल्मकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. 






ब्रॉडवे आणि भारतीय सिनेमा हे जत्रेत हरवलेल्या जुळ्या भावासारखे आहेत, असंही आदित्य चोप्रांना वाटतं. ब्रॉडवे आणि भारतीय सिनेमात अनेक साम्यस्थळे आहेत. संगीत आणि नृत्ये हा जसा ब्रॉडवेचा अविभाज्य घटक आहे, तसा तो भारतीय सिनेमाचाही आहे. हे आदित्य चोप्रा आवर्जून सांगतात. ब्रॉडवेवर भव्यदिव्य कलाकृती सादर करणं हे प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. आदित्य चोप्रांनी अनेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या ध्येयाची ही स्वप्नपूर्तीच असणार आहे.  


'BUNTY AUR BABLI 2': 'बंटी और बबली-2' च्या फर्स्ट लूकची चर्चा; सैफ-राणीचा भन्नाट लूक


आदित्य चोप्राने पोस्टमध्ये लिहिलंय, 'मी हॉलिवूडमधील पॉप कल्चरपासून प्रभावितच झालोय. काही बॉलिवूड चित्रपटांच्या निर्मितीनंतर मी हॉलिवूडमध्ये जाणार आणि इंग्रजी भाषिक प्रेक्षकांसाठी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट तयार करायचा, असं मी ठरवलं होते. डीडीएलजे हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमधील तो सुपर हिट चित्रपट आहे. त्या चित्रपटाने मला ओळख दिली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझा चित्रपट क्षेत्रातमध्ये प्रवास सुरू झाला. '     


' ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्यूजिकल' या म्युजिकल प्लेची गोष्ट वेगळी असणार आहे. एका अमेरिकन मुलाची आणि भारतीय मुलीची ही प्रेम कथा असणार आहे. पण यावेळी माध्यम चित्रपट नाही तर रंगमंच असणार आहे,  इंग्रजी ब्रॉडवे म्यूजिक स्वरूपात आम्ही ही कथा मांडणार आहोत', असं आदित्य चोप्राने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ही संगितीका तयार करत असताना त्यांनी नाटक क्षेत्रातील अनेक ब्रॉडवे म्यूजिकल्स आणि कलाकरांना भेटून त्यांच्याकडून नवं नवीन गोष्टी शिकत असल्याचे देखील आदित्य चोप्रा यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. 


Urfi Javed : 'तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते' उर्फीने सांगितला सेटवरील धक्कादायक अनुभव