Nysa Devgn: अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची मुलगी न्यासा देवगण (nysa devgn) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो न्यासा सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकतीच न्यासानं एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीमधील न्यासाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोला आणि व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी न्यासाला ट्रोल केलं आहे. न्यासानं प्लास्टिक सर्जरी केली आहे का?, असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत. 


नेटकऱ्यांनी केलं न्यासाला ट्रोल


न्यासा जेव्हा दिवाळी पार्टीला जात होती तेव्हा तिचे अनेक फोटोग्राफर्सनं फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यानं कमेंट केली, 'जान्हवी कपूर आणि न्यासानं एकाच डॉक्टरकडून प्लास्टिक सर्जरी करुन घेतली असेल.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मेकअप केला आहे की चुना लावला आहे', 'न्यासानं नाकाची प्लास्टिक सर्जरी केली आहे का?' असा प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये न्यासा ही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. निळ्या रंगाचा ड्रेस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये ती दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ: 






न्यासा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिला 162 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. न्यासा वेगवेगळ्या ठिकाणी वेकेशनला जाते. तेथील मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तसेच न्यासा अजय आणि काजोलसोबतचे फोटो देखील शेअर करते. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


काजोल-अजय देवगणची मुलगी न्यासाचं वर्णभेदी ट्रोलिंग