Nora Fatehi Files Defamation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोराने तिच्या याचिकेत जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 


जॅकलिन फर्नांडिसने स्वतःचे हित साधण्यासाठी नोराचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केला, असाही आरोप  नोरा फतेहीने केला आहे. नोराने याचिकेत म्हटलं आहे की, जॅकलिननं तिच्याबाबत खोटे विधान केले जे अनावश्यक आणि अनुचित होते. तसेच नोरानं 15 मीडिया हाऊसविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्यानं गुन्हा दाखल केला. 


सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग  प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने नोरा आणि जॅकलिनची चौकशी केली होती.  'इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीनेही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या, या प्रकरणात नोरा फतेही आणि इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आले  आहे. पण, माझ्यावर आरोपी असल्याचा ठप्पा का?' असा प्रश्न जॅकलिनने ईडीला विचारला होता. 


आज जॅकलिन कोर्टात झाली होती हजर


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन आज (12 डिसेंबर) दिल्ली न्यायालयात हजर झाली. न्यायालयाने सुनावणी एका आठवड्याने पुढे ढकलली. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी या प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलले आहे. जॅकलिन फर्नांडिसच्य वकिलांनी सांगितले की, तिला अद्याप ईडीकडून चार्जशीट आणि इतर कागदपत्रांच्या संपूर्ण प्रती मिळालेल्या नाहीत.