Ram Charan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण (Ram Charan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण सध्या राम चरण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना (Upasana) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली. 


राम चरणची पोस्ट 


राम चरणनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 'आम्हाला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की, श्री हनुमान जी यांच्या आशीर्वादाने राम चरण आणि उपासना हे दोघे लवकरच त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. प्रेम आणि कृतज्ञता. सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेली, शोबाना आणि अनिल कामिनेनी.', असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


राम चरणचे वडील अभिनेते चिरंजीवी यांनी देखील ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.  राम चरणनं शेअर केलेल्या पोस्टला अनेकांनी लाइक केलं असून काहींनी पोस्टला कमेंट करुन उपासना आणि राम चरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राम चरण आणि उपासना यांनी  2012 मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही एकमेंकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 






राम चरणचा आगामी चित्रपट 


राम चरण हा दिग्दर्शक शंकर यांच्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव RC 15 आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात राम चरणसोबतच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी प्रमुख भूमिका साकारणार आहे. राम चरणच्या आरआरआर या चित्रपटाला भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली. आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ram Charan : राम चरणची एक झलक पाहण्यासाठी हॉटेलच्या भिंतीवर चढले चाहते; फुलांचा वर्षाव करून केलं स्वागत