Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. तसेच अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt), रश्मी देसाई (Rashami Desai) यांनी देखील या यात्रेमध्ये सहभाग घेतला. आता नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवर आरोप केला आहेत. या सेलिब्रिटींना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर करुन केला आहे.

  


नितेश राणे यांचा आरोप 
नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एका मेसेजचा स्क्रिन शॉर्ट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉर्ममध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींना पैसे भरावे लागतील. या ट्वीटमध्ये नितेश राणे यांनी लिहिलं, 'राहुल गांधी यांची यात्रा ही सर्व आधीच मॅनेज केलेली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे देण्यात आले आहेत, हे या पुराव्याम1धून कळतं. सब गोलमाल है भाई.' 


पूजा भटचं ट्वीट


नितेश राणे यांच्या ट्वीटला रिप्लाय देत अभिनेत्री पूजा भटनं लिहिलं, 'त्यांचे विचार आहेत आणि ते त्यांच्या विचारांवर ठाम आहे. पण इतरांच्या मतांपेक्षा मी स्वत:च्या मतांचा विचार करते. मी माझ्या विवेकबुद्धीचा वापर करुन विचार करु शकते.'






या सेलिब्रिटींनी घेतला भारत जोडो यात्रेत सहभाग


पूजा भट, रश्मी देसाई, अमोल पालेकर,  रिया सेन या कलाकारांनी सहभाग घेतला. या सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही नेटकऱ्यांनी या सेलिब्रिटींना ट्रोल केलं आहे तर काहींनी या सेलिब्रिटींना पाठिंबा दिला. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashoke Pandit On Amol Palekar: 'दो दीवाने शहर में'; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अमोल पालेकर सहभागी होताच 'या' फिल्म मेकरनं केलं ट्वीट