Nick Jonas Malti Marie Cute Photo : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकाच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. कधी ती लाडक्या लेकीसोबत खेळताना दिसते, तर कधी मंदिरात दर्शन घेताना दिसते. पण आता प्रियांकाच्या लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती निक जोनाससोबत (Nick Jonas) दिसत आहे. 


निकसोबत दिसली मालती मेरी


बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राप्रमाणे तिच्या लाडक्या लेकीचा अर्थात मालती मेरीचादेखील (Malti Marie) सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आता मालतीचा एक फोटो सोशल मीडियावर मालतीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मालती मेरी तिच्या वडिलांसोबत म्हणजेच निक जोनाससोबत दिसत आहे. या फोटोमध्ये निकने मालतीला कडेवर घेतलेलं दिसत आहे. निकने मालतीसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 






निक जोनासने पहिल्यांदाच शेअर केला मालतीचा फोटो


प्रियांका चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लाडक्या लेकीचे फोटो शेअर करत असते. पण खूप कमी फोटोंमध्ये ती तिच्या लेकीचा चेहरा दाखवत असते. पण आता निक जोनासने पहिल्यांदाच मालती मेरीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  निक आणि मालतीचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 


निक जोनासने शेअर केलेल्या फोटोत त्याने काळ्या रंगाचा प्रिंटेड-शर्ट परिधान केला आहे. तर मालतीने निळ्या रंगाचा फ्रॉक परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत निकने एक हार्ट इमोजीदेखील शेअर केला आहे. या फोटोवर किती गोड, गोंडस, बाप-लेक, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


प्रियांका चोप्राच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Priyanka Chopra Upcoming Project)


प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही सीरिज प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. या सीरिजनंतर आता ती एका बॉलिवूड सिनेमात दिसू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 2003 साली 'अंदाज'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांचा प्रियांका चोप्रा भाग आहे.


संबंधित बातम्या


Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज