मुंबई : पद्मावत सिनेमातील ‘घूमर’ गाण्याचं नव व्हर्जन आज रिलीज करण्यात आलं. करणी सेनेच्या कट्टर विरोधानंतर सूचवलेल्या सूचनांप्रमाणे गाण्यात बदल करण्यात आले आहेत.

आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सूचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय यूट्यूबवरूनही ओरिजिनल जुनं गाणं हटवण्यात आलं आहे.

गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.

ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते दृश्य राणी पद्मावतीच्या प्रतिमेच्या विरोधी आहे. त्यामुळे या गाण्यात आवश्यक बदल करण्यास सांगितलं होतं.

सेन्सॉर बोर्डासमोर जेव्हा सिनेमाची स्क्रीनिंग करण्यात आली, तेव्हा गाण्यात बदल करण्याची सूचना बोर्डाने केली. 'घूमर' गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ती दृश्य हटवण्याची सूचना सीबीएफसीच्या विशेष समितीने निर्मात्यांना केली.

मात्र अशा प्रकारच्या एडिटिंगमुळे गाण्याची कोरिओग्राफी बिघडेल. त्यामुळे दीपिकाची कंबर ग्राफिक्सद्वारे लपवण्यासाठी दिग्दर्शक भन्साळी तयार झाले. अखेर या बदलासह नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

पाहा गाण्याचा व्हिडीओ :